पश्चिम बंगालमध्ये पुढील मुख्यमंत्री भाजपचा असणार ,तुम्ही स्थलांतरित मजुरांच्या जखमांवर मीठ चोळत आहात आणि ते ही गोष्ट विसरणार
नाहीत' असा इशारा अमित शाह
यांनी ममता बॅनर्जी यांना दिला.
नवी दिल्ली : ममतादीदी, ज्या ‘श्रमिक
ट्रेन्स’ची
तुम्ही ‘कोरोना
एक्स्प्रेस’ अशा शब्दात थट्टा केली, तीच तुमच्या तृणमूल पक्षाचा ‘निर्गमन
मार्ग’ ठरेल,व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून झालेल्या भाषणात अमित शहा यांनी पश्चिम
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.“ममता
दीदी, तुम्ही
दिलेले ‘कोरोना
एक्स्प्रेस’ हे नावच तुमचा ‘एक्झिट
रुट’ होईल. तुम्ही स्थलांतरित मजुरांच्या
जखमांवर मीठ चोळत आहात आणि ते ही गोष्ट विसरणार नाहीत’ असा इशारा भाजप कार्यकर्त्यांना
ऑनलाइन संबोधित करताना अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना दिला.
बंगाल सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही,
असा आरोप करत अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान देताना म्हटले की,
"ही राजकारण करण्याची गोष्ट नाही, राजकारणासाठी बऱ्याच गोष्टी
आहेत. तुम्ही मैदान ठरवा आणि समोरा-समोर येऊ. तुम्ही बंगालमधील गरिबांसाठी
केंद्राची योजना लागू होऊ देत नाहीत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु
झाल्यापासूनच ममता बॅनर्जी आणि अमित शाह यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
कोरोनाविरुद्ध लढा देण्याच्या बंगाल सरकारच्या प्रयत्नांना कमकुवत करण्याचा
प्रयत्न केल्याचा आरोप ममता यांनी शाह आणि केंद्र सरकारमधील इतरांवर केला होता.
भाजपने आपल्या राज्यात अवाजवी हस्तक्षेप केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
बंगालमधील पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असणार
ममता बॅनर्जींवर जोरदार टीका करताना अमित शाह
पुढे म्हणाले की, आम्ही प्रवासी मजुरांसाठी विशेष श्रमिक ट्रेनची सुविधा केली, मात्र ममता बॅनर्जींनी या ट्रेनला कोरोना
एक्स्प्रेसचं नाव देऊन कामगारांचा अपमान केला आहे. शाह म्हणाले की मजुरांची ही
गाडी तुम्हाला पळवून लावेल. तुम्ही काहीही करा पण पश्चिम बंगालमधील पुढचा
मुख्यमंत्री भाजपाचाच असणार आहे.
0 Comments