कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात अंतर्गत शीतयुद्ध चालू ?

कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील हे मुश्रीफ यांच्या पुढे जात आहेत ? कोल्हापूर जिल्ह्यचे राजकारण हा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो . 
कोल्हापूर :आता पुन्हा एकदा पालकमंत्री निवडीनंतर मुश्रीफ व बंटी पाटील यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे . जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेत्यांच्या राजकीय कुरघोड्या चालूच असतात .
सतेज पाटील यांनी प्रलंबित  पुरग्रस्थ निधी मंजूर  आणल्याची बातमी प्रसारित झाली . सतेज टीम  देखील हि बातमी उचलून धरत वाह वाह मिळवली पण लगेच मंत्री मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया देत आपण स्वतः या निधीसाठी पूर्वीपासून पाठपुरावा करत आहोत कदाचित हे बंटी पाटील याना माहिती नसावे असा खोचक टोला देखील लगावला .
सद्या दोन्ही नेते एकत्र येऊन काम करत असल्याचे दिसून येत  असले तरी त्याच्यात अंतर्गत वाद रंगला आहे . यात शंका नाही कारण पालकमंत्री निवडीवेळी देखील याची प्रचिती झाली होती .
जिल्ह्यच्या संपूर्ण चाव्या आपल्या हातात घेण्याचे स्वप्न मंत्री पाटील पाहत असले तरी मुश्रीफ यांची नाराजी ओढवून घेत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही . मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्याना देखील हे सहन होणार नाही असे राजकीय वर्तुळात बोलले जाते .
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक - पी. एन . पाटील ,व मुश्रीफ - बंटी पाटील अशी जोड राजकारणात सक्रिय आहे . मंत्री पद निवडीवेळी  बंटी पाटील व पी. एन . पाटील यांच्यात सोशल मीडिया वॉर चालू होते आणि आजही त्याचे पडसाद जाणवत आहेत . आता बंटी पाटील व मुश्रीफ यांच्यात अंतर्गत शीतयुद्ध चालू असल्याचे काही गोष्टींवरून  समजते .
शेवटी याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार यात काही शंका नाही. राजकीय नेते राजकारणात येत असलेल्या लहान मोठ्या अनुभवावरून पुढील राजकीय गणिते आखात असतात कारण नाकापेक्षा मोती जड होऊन चालत नाही .
आता मुश्रीफ यांनी यावर स्पष्टीकरण देत बंटी पाटील हे माझे नेहमीच सन्मान करतात व आमच्यात काही अंतर्गत कलगीतुरा नाही नाही असे स्प्ष्ट  केले असता हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर का येते ? याचा अर्थ पुढील काळात हि अशीच स्पष्टीकरण देत राहणार कि वेळीच सावध होणार हे पाहंण महत्वाच आहे  

Post a Comment

0 Comments