विशेष : कोरोनामुळे मुंबई भारतातील न्यूयॉर्क होण्याच्या मार्गावर आहे का ?

18 मे ला न्यूयॉर्कमध्ये एकापण रुग्णाचा मृत्यू झाला नाही , पण मुंबई मध्ये मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकट्या धारावी मध्ये जेवढे कोरोना रुग्ण  आहेत , तेवढे ओडिशा, हरियाणा आणि  झारखंड सारख्या मोठया राज्य मध्ये पण नाहीत
नवी दिल्ली: या महिन्याच्या सुरवातीला म्हणजे 1 मे च्या दिवशी न्यूयॉर्क शहरांमध्ये 1865 जणांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्याच दिवशी मुंबईमध्ये 750 पॉंझिटिव्ह रुग्ण आढळले होते, म्हणजे मुंबईची आकडेवारी ही न्यूयॉर्कच्या आकडेवारी निम्म्याहून कमी होती. परंतु आता ही आकडेवारी उलट झाली आहे आता मुंबईमध्ये एका दिवसात न्यूयॉर्कपेक्ष्या जास्त लोक संक्रमित होत आहेत.18 मे ला न्यूयॉर्कमध्ये एक पण रुग्ण मृत्युमुखी पडला नाही,पण मुंबईमध्ये मृत्यूचा आकडा वाढतंच चालला आहे. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सोशल डीस्टेसिंग चा फज्जा उडत आहे , त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतोय की कोरोनामुळे मुंबईची परिस्थिती न्यूयॉर्क सारखी तर होणार नाही ना ?
मुंबई भारतातील न्यूयॉर्क बनेल का ? आपण विचार करत असाल की हा प्रश्न का कारण आमचा सांगण्याचं उद्देश हा नाही की मुंबई आता न्यूयॉर्क सारखी विकसित आणि धनवान बनणार आहे.सध्या विकासाच्या बाबतीत दोन्ही शहरांची तुलना करणे चुकीचे आहे .येथे चर्चा कोरोना संक्रमणाची होत आहे .  प्रत्यक्ष्यात कोरोना रुग्णांची संख्या अश्यापद्धतीने वाढत आहे जशी न्यूयॉर्कमध्ये वाढली.अमेरिकेमध्ये जेवढे रुग्ण आहेत त्यापैकी 12.19% रुग्ण हे न्यूयॉर्क मध्ये आहेत तर मुंबईमध्ये 21.3% कोरोना रुग्ण आहेत. याचप्रकारे मृतांच्या  प्रकरणात मुंबई ,न्यूयॉर्क च्या मार्गावर चालतं आहे.अमेरिकेत झालेल्या मृतांपैकी 22.32% मृत्यू हे एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत,तर भारतात झालेल्या मृतांपैकी 24.22% मृत्यू हे मुंबई मध्ये झालेले आहेत.

Post a Comment

0 Comments