मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती . तेव्हा त्यानी असे सांगितले होते कि गर्दी करू नका,नियमांचे पालन करा परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा लॉकडाउन घोषित करावा लागेल . असा इशारा दिला होता ,त्यानंतर सोशल मीडियावर लॉकडाउन वाढल्याचा अफवा पसरल्या होत्या . 

मुंबई : भारतासह महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे . त्यातच लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे .लॉकडाउन ५ मध्ये बऱ्याच गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. परंतु नियमाचे पालन होत नाही आहे अनेक ठिकाणी गर्दी झालेली बघायला मिळत आहे , याच बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी असे आवाहन केले होते कि गर्दी करू नका सूचनांचे पालन करा नाहीतर पुन्हा लॉकडाउन करण्यांत येईल. परंतु सोशल मीडियावर लॉक डाउन पुन्हा जाहीर केलं आहे आशा अफवा पसरत होत्या. त्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी लॉक डाउन अजून घोषित केलेला नाही असं स्पष्टीकरण मुंख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.
लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही . कृपा करून गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. स्वतःची काळजी घ्या. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवा थांबवण्यासाठी केलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले होते की, 'परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल.' त्यांच्या या वक्तव्यामुळे लॉकडाऊन पुन्हा कठोर होणार असल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. त्यामुळे या अफवा थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करत स्पष्टिकरण देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषेदेत बोलताना म्हंटले कि , कोरोनाविरुद्धचा आपला लढा अजूनही संपलेला नाही . तो वाढतच चालला आहे म्हणून सर्वानी आता कोरोनासोबतच जगन्याची सवय करायला हवी. कुणीही घाई किंवा गर्दी करू नये. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदेत बोलताना केलं आहे. पण परिस्थिती जर हाताबाहेर जात असेल तर पुन्हा लॉकडाउन करण्याचेही ते बोलत होते.
त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि लॉक डाउन जसे टप्याटप्याने वाढवले तसे ते टप्याटप्याने आपण हटवत आहोत. पण तरीही कोरोनाच संकट अजूनही टळलेल नाही त्यामुळे आता कोरोनासोबत जगण्याची तयारी सर्वानी ठेवली पाहिजे. हात साबणाने स्वछ धुतले पाहिजेत. उगाच गर्दी करू नये. बाहेर पडताना मास्कचा वापर केला पाहिजे. आशा अनेक सवयी अंगी लावल्या .कोरोनासोबतचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे.
0 Comments