पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलाने सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोनिया यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली.
पीएम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन दिशाभूल करणारे ट्वीट केल्याचा आरोप वकील के व्ही प्रवीण यांनी केला असून, ११ मे रोजी कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणत्या ट्विटविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने २८ मार्चला पीएम केअर्स फंडाची स्थापना केली. पीएम केअर्स फंडची स्थापना केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, सोनिया गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत पायपीट करणाऱ्या मजुरांसदर्भात व्यक्त होत पीएम केअर्स फंडावर निशाणा साधला होता.
0 Comments