सरकारने जाहिर केलिली मदत ही अंतिम नसून,पंचनामे करुन काय मदत दयायची हे ठरेल गरज भासली तर केंद्रात जाऊन पाठपुरवा करू ,अस आश्वासन शरद पवारांनी दिले.

रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे खूप मोठयाप्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार २ दिवस कोकण दौऱ्यावर आहेत . त्यांनी आज रायगड जिल्यातील नुकसानग्रस्थ भागाची पाहणी केली चक्रीवादळामुळे खूप मोठे नुकसान झाले असून यावेळी राज्य दुहेरी संकटात आहे . कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून व्यवहार ठप्प आहेत, व्यवसाय थांबले आहेत. राज्य सरकारच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.
सरकारने जाहिर केलिली मदत ही अंतिम नसून,पंचनामे करुन काय मदत दयायची हे ठरेल. आधी राज्यात पाठपुरावा करूआणि गरज भासली तर केंद्रात जाऊन पाठपुरवा करू ,अस आश्वासन शरद पवारांनी दिले. लवकर पंचनामे झाले पाहिजेत. केंद्र सरकारची टीम येऊन पाहणी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. महाराष्ट्रावरचं हे संकट आहे, त्यामुळे यात पक्ष, राजकारण बघू नये. सगळ्यांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत केली पाहिजे, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.

केंद्र सरकार आणि राज्याला सांगून मदत घ्यावी लागेल. छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पाच ते सहा दिवसाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करणं आवश्यक आहे. टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची टीम याठिकाणी आली तर मदत होईल. अदानीमधून काहीजण मदतीला आले, असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. पाणीपुरवठा लवकर सुरू केला पाहिजे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
0 Comments