- निसर्गवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ११ व १२ जुन दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते .
- यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच शरद पवार यांनी काल मारलेल्या टोमण्यावर उत्तरही दिले.
अलिबाग : वडिलांना वाटत असतं मुलगा कितीही मोठा झाला तरीही त्याला काहीही कळत नाही. तसे शरद पवार साहेब हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत, म्हणून ते मला असे म्हणत असतील असे देवेंद्र फडणीवस यांनी सांगितले माझ्या खांद्यावरुन त्यांना वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर निशाणा साधायचा असेल. तुम्ही देखील काही तरी करा असं सांगायचं असेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
- यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच शरद पवार यांनी काल मारलेल्या टोमण्यावर उत्तरही दिले.
फडणवीस हे नागपूरचे आहेत विधर्भाचा आणि नागपूरचा काहीही संबंध नाही ते कोकनातं आले ते चांगलंच आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात थोडी भर तरी पडेल असा टोला शरद पवार यांनी लगावला. मी बारामती सारख्या दुष्काळी भागातून येतो फडणवीस विदर्भातून येतात, त्यांचा समुद्राशी काहीही संबंध नाही त्यामुळे ते येत आहेत हे चांगलं आहे', असं टोला लगावला होता.
यावर फडणवीस म्हणाले के ८१ वर्ष असणारे शरद पवार हे काम करत नसतील म्हणून फिरत आहेत. असा टोमणा महाविकास आघाडीवर मारला.
फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यात पहिल्यांदा सरकार विरुद्ध सचिव असं चित्र आहे. आपल्या मंत्र्यांचे ऐका, सचिवांचं ऐका, समन्वय करा हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. प्रशासनावर पकड मजबूत नाही. उद्धव ठाकरे यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही. पण मित्र आहेत गेले पाच वर्षे एकत्र होतो तर हे सांभाळून घेतलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
कोणताही निर्णय किंवा अधिकार सांगत असताना राज्यपालांची भूमिका ही महत्वाची असते . मंत्र्यांना माहिती असायला हवं कि त्यांना कोणते अधिकार आहेत आणि कोणते नाहीत. केटी परीक्षा होणार, इंजिनिअर, मेडिकल परीक्षा होणार मग कोणत्या परीक्षा होणार नाही? असा सवालही त्यांनी केला.
नुकसानीबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकांना अधिकची मदत दिली पाहिजे. हा दौरा झाल्यावर मी अहवाल बनवणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. याबाबत केंद्राशी चर्चा झाली ते म्हणाले राज्याकडून प्रस्ताव आल्यावर मदत करु, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष आहेत. कोरोना , चक्रीवादळ यांसारखी संकट देशावर असताना त्यांनी आपसात न भांडता या संकटावर कशी मात करता येईल याच्यावर फोकस केला पाहिजे . शासन आणि प्रशासन वाद योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.
0 Comments