मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ? सुनील तटकरे यांनी दिली माहिती .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मुंबईच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महत्व्वाची बैठक पार पडली. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरे म्हणतात...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी त्त्यांच्यासोबत बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेतेही हजर होते . हो बैठक मुंबईच्या शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडली . 
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली . 
 २ दिवस नुकसानग्रस्थ भागाची पाहणी केली असता कोकणात कोणत्या भागात किती नुकसान झाले आहे याची माहिती शरद पवारानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याना दिली . 

 “नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. अजूनही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्टींवर बैठकीत चर्चा झाली. येत्या चार ते पाच दिवसात नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून अतिशय सकारात्मक निर्णय घेतले जातील. या निर्णयांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
 मस्त्य व्यवसाय , छोटे - मोठे उद्योगधंदयांना कसा आधार देता येईल ,कोकणातील पर्यटन व्यवसाय हा गेल्या ३ महिन्यापासून बंद आहे त्यामुळे पर्यटनाला कशी चालना देता येईल फळबागा पुनर्जीवित कश्या करता येतील या सर्वच गोष्टीवर सखोल  चर्चा झाली , असं सुनील तटकरे यांनी सांगितले . 
वीजपुरवठा जितक्या लवकर सुरु करता येईल यावर चर्चा झाली ,कारण वीज पुरवठा सुरु झाला कि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल . काही ठिकाणी जनरेटर उपलब्ध करून दिले आहेत परंतु ते सगळीकडे देणे शक्य नाही . त्यामुळे सर्वाधिक मनुष्यबळ लावून युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरु करावा अशी चर्चा या बैठकित झाली . अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली . 
पालकमंत्री आदिती तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि मी स्वत: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत  आहेत . नुकसानग्रस्त भागांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत.मुल्यांकन करत असताना झाडांचं देखील मुल्यांकन करावं, ही भूमिका आम्ही घेतली आहे. तसेच नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली जाईल”, असं सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान, “शरद पवार यांनी कोकण दौऱ्यादरम्यान नुकसानग्रस्त नागरिकांना धीर दिला. पवार यांच्या धीरामुळे आपण पुन्हा उभं राहू शकतो, असा आत्मविश्वास सर्वसामान्य नागरिकाच्या मनात जागृत झाला आहे”, असंदेखील सुनील तटकरे म्हणाले.

Post a Comment

0 Comments