- राजू शेट्टी याना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यावर संघनेतील काही नेते नाराज होते .
- उमेदवारीची चर्चा सुरु झाल्यवर शेट्टी यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करत मैत्रीत कटुता येत असेल तर मला हि आमदारकीच नको असे म्हंटले होते .

यानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत दीर्घ काळापासून चालत आलेल्या मैत्रीत कटुता येत असेल तर मला हि आमदारकीचं नको . मैत्रीत दुरावा निर्माण होऊन अविश्वास निर्माण होत असेल तर विधानपरिषदेच ब्यादच नको असे मत मांडत त्यांनी आपली भूमिका सोशल मीडियावर स्पष्ट केली . समोरून आलेले तलवारीचे घाव भरून निघतात , पण घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात . संघटना संपवण्याचा खूप वेळा प्रयत्न झाला पण आम्ही रक्त सांडून संघटना उभी केली आहे ,कुणाच्या मायावी प्रयत्नांनी संपणार नाही .
राजू शेट्टी यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर राज्यभरातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आमदारकी स्वीकारावी, अशी मागणी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा अध्यक्षा पूजा मोरे यांनी तर रक्ताने पत्र लिहित राजू शेट्टी यांनी विधानपरिषद आमदारकी स्वीकारावी अशी मागणी केली होती. तर शेट्टी यांनी आमदारकी न स्वीकारल्यास काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिला होता.
यानंतर काल राजू शेट्टी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राजू शेट्टी यांनी या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी दूर केली. काल या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर वादावर पडदा पडला. चळवळीला नख लागेल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही असं नाराज झालेल्या दोन्ही नेत्यांनी राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलं होतं. चर्चेतून नाव पुढे यावं अशी नाराज नेत्यांची मागणी होती.
0 Comments