कोरोनासाठी 'मुंबई मेगा लॅब'ची संकल्पना, महिन्यात सर्व मुंबईकरांची कोरोना चाचणी करण्याचे आव्हान

जगातील 15 कंपन्यांनी या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच प्रोजेक्टमध्ये देशातील आयआयटीचे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मेगा लॅब तयार करण्याच्या कामात सहभाग असणार आहे.The concept of Mumbai Mega Lab for Corona, a challenge to test all Mumbaikars in a month

मुंबई : आयआयटी अल्युमिनाय कौन्सिल आणि मुंबई विद्यापीठद्वारे मुंबई मेगा लॅब संकल्पना अस्तित्वात आणण्याचा काम सुरू आहे. यामध्ये मुंबईतील लोकसंख्येचा विचार केला आहे. आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांची कोरोना टेस्ट एक ते दीड महिन्यामध्ये कशी पूर्ण करता येईल याबद्दल प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच ही मेघा लॅब सुरु करण्याची संकल्पना केली जात आहे. यामध्ये जगातील १५ कंपन्यांनी काम करण्यासाठी आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबोरबोर देशातील आयटीआय आणि मुंबई विद्यापीठाचे माजी विध्यार्थी आणि प्राध्यापकांचा मेगा लॅब तयार करण्याच्या कामात सहभाग असणार आहे. 
ही मुंबई मेगा लॅब लवकारात लवकर अस्तिवात यावी यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत नॅशनल सेंटर ऑफ नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजीचे संचालक समीर कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आतापर्यंत 15 जगातील विविध कंपन्यांनी या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यातील विश्वाससार्हता व इतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत चाचपणी करून एक किंवा अधिक कंपन्याना मेगा लॅब प्रोजेक्टमध्ये सहभागी करण्याचा विचार आहे. यामध्ये व्यक्तीच्या स्वॅब टेस्टिंगपासून इतर सर्व प्रक्रिया करू शकेल अशा तंत्रज्ञानाचा वापर करून कोणताही संपर्क न करता म्हणजेच कॉन्टॅक्टलेस तपासण्या कशा करता येतील यावर भर दिला जाणार आहे'.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत आशा स्थितीत कोरोना टेस्ट लवकारातलवकर करता यावी म्हणून ही मेघा लॅब सुरु करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर लक्षणे नसताना कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती यातून बाहेर येतील. सध्याच्या स्थितीत कोरोना चाचणी करण्यासाठी चार ते साडेचार हजार रुपये खर्च येतो. परंतु  या लॅबमुळे ही चाचणी आता सर्वांना परवडेल अशी असेल . सर्वांना परवडेल आशा दृश्टीकोनातूनच हि प्रयत्न करत आहे अशी माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली. १५ ऑगस्टपर्यत ही लॅब सुरू करण्याचे प्रयत्न असून त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे ही लॅब अस्तित्वात आल्यास कोरोनाच्या तपासणी वाढवून संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते.

Post a Comment

0 Comments