देशासाठी दिलासादायक बातमी: 'डेक्सामेथासोन'मुळे कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा

देशासाठी दिलासादायक बातमी: 

'डेक्सामेथासोन'मुळे कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा दावा

कोरोनावर औषध मिळालं असं म्हंटल जातंय. कारण कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णांना 

डेक्सामेथासोन हे औषध प्रभावी ठरत आहे. या औषधामुळे कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णाचे जीव वाचले आहेत. हे औषध अगदी स्वस्त आणि सहज उपलब्ध होणार आहे. डेक्सामेथासोनवर जगभरात संशोधन सुरु आहे.    Dexamethasone Corona Vaccine life saving medicine on covid 19 virus

मुंबई : गेले कित्येक दिवस कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत. यातच ब्रिटनच्या  शास्त्रज्ञानी असा दावा केला कि कोरोनाची लागण  झालेल्या रुग्णावर 
डेक्सामेथासोन हे औषध प्रभावी ठरत आहे. या औषधामुळे कित्येक कोरोना झालेले रुग्ण बरे झाले आहेत. हे औषध खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध होणार आहे. डेक्सामेथासोनवर जगभरात संशोधन सुरु आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या परीक्षणातून असं समोर आलं आहे की, जे लोकं व्हेंटिलेटरवर होते त्यांच्या डेक्सामेथासोनचा उपयोग केला असता त्यांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीअंश कमी झालं आहे.
व्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी आशेचा किरण 
 संशोधकांच्या मते अंदाजानुसार या औषधाचा उपयोग जर ब्रिटन महामारीच्या सुरवातीला केला असता तर आतापर्यंत ५००० हजार लोकांचा जीव वाचला असता. या औषधाचा कोरोनाच्या रुग्णांवर प्रयोग केल्यानंतर अनेक अतिजोखमीचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे डेक्समेथासोन हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन व्हेंटिलेटरवरील तसेच ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचं बोललं जात आहे.

हॉस्पीटलमध्ये दाखल न होता 20 पैकी 19 रुग्ण ठीक झाल्याचा दावा

डेक्सामेथासोनमुळे  कोरोना झालेले पण दवाखान्यात न गेलेले असे २० पैकी १९ रुग्ण बरे झाल्याचं समोर आलंय . त्याचबरोबर दवाखान्यात असलेले सुद्धा रुग्ण बरे होत आहेत पण त्यांना ऑक्सिजन तसेच अजून काही गोष्टीची कमी पडली. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका टीमने केलेल्या संशोधनात दवाखान्यात दाखल 2 हजार रुग्णांना हे औषध दिलं गेलं.तसेच दवाखान्यात नसलेल्या पण कोरोना झालेल्या  ४००० हजार रुग्णांना हे औषध दिल गेलं. या औषधामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा धोका आता ४०  टक्क्यावरून २८ टक्क्यावर आला आहे. तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती आशा रुग्णांचा मृत्यूचा धोका हा २५ टक्क्यावरून २० टक्क्यावर आला आहे असा दावा केला जात आहे. 

ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी म्हटलं आहे की, या संशोधनामुळं नक्कीच आनंद व्यक्त केला जाऊ शकतो. आम्ही या औषधाचं सप्लाय करण्यासंदर्भात योग्य पावलं उचलली आहेत. संशोधक  प्रोफेसर पीटर होर्बी यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत हेच औषध आहे ज्यामुळं मृत्युदर कमी झाला आहे. प्रोफेसर लॅंडरी यांनी दवाखान्यात भर्ती रुग्णांवर या औषधाचा उपयोग करावा असं म्हटलंय तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी डेक्सामेथासोनचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने गंभीर आजारी लोकांवरच करावा असं म्हटलंय. हे औषध योग्य प्रकारे न घेतल्यास धोका संभवू शकतो, असंही त्यांनी म्हटलंय.
डेक्सामेथासोन हे औषध स्वस्त देखील असल्याने जगभरातील गरीब देशांना देखील याचा लाभ होणार आहे.

Post a Comment

0 Comments