मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ ; विविध देशातील कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचा गुंतवणूक करार.
राज्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ केला आहे. यामध्ये विविध देशातील कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आला आहे.
मुंबई : देशात कोरोनासारखे मोठे संकट असताना सुद्धा राज्यसरकारने विविध देशातील कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचा सामंजस्य करार केला आहे. राज्यात कोरोनसारखी कठीण परिस्थिती असतानासुद्धा आपण महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवल तो आम्ही सार्थ करू. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले के महाराष्ट्रात अनेक लहान मोठे उद्योग सुरु करण्यासाठीसुद्धा परवानगी देऊ. यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 प्रारंभ करताना विविध देशाचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती ऑनलाईन उपस्थित होते. अमेरिका, चीन, दक्षिणकोरीया ,सिंगापूर, आदी देशातील त्याचबरोबर काही भारतीय गुंतवणूकदारासोबत आशा विविध १२ देशातील गुंतवणूकदारासोबत १६ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम
- हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि २५०० रोजगार
- वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी
- हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक - 2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार
- असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार
- एक्सॉन मोबिल (अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी
- इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन - रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार
- युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000
- असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी
- इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500
- रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी
- पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500
- ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि 2042
0 Comments