मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीला जवळजवळ १० ते ११ दिवस होऊन गेले आहेत. पण तरीही अजूनही सरकारने काहीही हालचाल केलेली नाही. वादळग्रस्तांना अजूनही काहीच मदत मिळालेली नाही. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलताना व्यक्त केली. कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी कोकणासाठी विविध मागण्या केल्या.
तात्काळ रोख रक्कम मदत करा
वादळग्रस्तांना अजून एकही रुपयाची मदत मिळालेली नाही. सरकारच अस्तित्व कुठंही दिसत नाही. वादळग्रस्तांना शाळामंध्ये ठेवलं आहे. कोकण दौऱ्यावर गेल्यावर माझ्यासमोर जे सत्य आलं ते मी उद्धवजींना सांगितलं. लोकांना लवकर मदत मिळायला हवी. असं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना सांगितले .
“झाडं उन्मळून पडली आहेत, हेक्टरी 50 हजारांची मदत तोकडी आहे. झाडं पुढची १० वर्षे उत्पादन देऊ शकणार नाहीत. त्यामुळे फळ पिकांची योजना लागू करुन त्यांना मदत करणे आवश्यक आहे,” असा सल्लाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
नागरिक घराबाहेर राहतील, तोपर्यंत घरभाडे द्यावे
निसर्ग चक्रीवादळामुळे खूप नुकसान झालं आहे. झाड पडली आहेत. ती साफ करायला पाहिजेत. सगळीकड़े स्वच्छता केली पाहिजे. सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. पावसामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाच्या मदतीने रोजगार हमीची कामे हाती घेतली पाहिजेत. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
वादळामुळे काहीजणांची घरे पडली आहेत. त्यामुळे काही नागरिक घराबाहेर राहत आहेत. जोपर्यंत ते नागरिक घराबाहेर राहातील तोपर्यंत त्यांना घरभाडे द्यावे .आत्मनिर्भर पॅकेजद्वारे ज्या योजना आहेत. त्या कोकणात लागू कराव्या. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करु,” असं म्हटलं आहे.
0 Comments