भारत-चीन दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

भारत आणि चीन यांच्या मध्ये चालू असलेल्या  सीमावादावर आज महत्वाची बैठक पार पडली . चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ,लडाखच्या सीमेवर दोन्ही बाजूमध्ये ले. जनरल स्तरावर हि चर्चा झाली . 
India China Border Talks On Ladakh Standoff News Updates नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढत असून या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन सीमावादावर महत्वाची बैठक पार पडली दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावरची ही सर्वोच्च चर्चा वाढलेल्या तणावाला शांत करु शकणार का हा प्रश्न आहे.गेल्या ३२ दिवसांपासून सुरु असलेल्या  सीमावादावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष्य होते . 
  • भारत आणि चीन मध्ये तणाव का वाढला ?
  • लडाखमध्ये ५ मे  ला दोन्ही सैन्यमध्ये झटपट झाली . 
  • लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली.
  • या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला.
  • भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले.
भारत आणि चीन च्या मध्ये ३४८८किलोमीटर लांब सीमा आहे जमू -काश्मीर, लडाख पासून ते सिक्कीम अरुणाचल पर्यंत या तीन भागात हि सीमा विस्तारली आहे .या ठिकाणी गेल्या महिन्पाभरापासून सैन्य जमवाजमव वाढू लागली होती . य आधीही  भारत चीनमध्ये  लोकल  कमांडर आणि मेजर जनरल स्तरावरचे लष्करी  पातळीवर  १२ राऊंड झाले होते. त्यानंतर बॉर्डर प्रोटोकॉलनुसार ले जनरल स्तरावरची सर्वोच चर्चाही पार पडली . लडाखमध्ये ज्या ठिकाणी वाद झाला होता , तिथून २० किलोमीटर अंतरावर म्हणजेच चीनच्या हद्दीत ही बैठक पार पडली.  या बैठकीआधी दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयातही सचिव स्तरावरची चर्चा पार पडली होती. तणावाचा हा मुद्दा दोन्ही देश शांततेनं, चर्चेच्या माध्यमातून सोडवतील असं म्हंटल गेलं .
लाईन ऑफ अँक्चुअल कंट्रोलवर जी आधीची स्थिती होती, ती भारताला हवी आहे. चीनच्या आक्रमकतेनंतर भारतानंही या परिसरात आपलं सैन्य वाढवलं आहे. तर तिकडे चीन आपल्या सरकारी वृत्तपत्रातून(ग्लोबल टाईम्समधून)भारत आपल्या लष्करी सामर्थ्याबद्दल अवाजवी अभिमान बाळगतोय, या भ्रमातून त्यांनी लवकर बाहेर यावं अशी भाषा केली जातेय. भारत चीन सीमेवर अचानक तणाव वाढवण्यामागे चीनचा नेमका उद्देश काय आहे, चीनला नेमकं काय करायचं आहे हे अद्याप उघड झालेलं नाहीय. कारण लडाख परिसरात जे डिफेन्स फॅसिलीटी सेंटर किंवा इतर कन्स्ट्रक्शन कामांमुळे चीन नाराज असल्याचं सांगितलं जातंय. ती कामं तर 2002-3 पासून सुरु होती. मागच्या वर्षातच इथल्या महत्वाच्या रोडचं काम भारतानं पूर्ण केलंय. चीनच्या दबावानंतरही या भागातली कामं थांबणार नाहीत हे भारतानं वारंवार स्पष्ट केलं आहे. एकीकडे कोरोनाचं संकट वाढत चाललेलं असताना आता सीमेवरतीही चीनची डोकेदुखी वाढली आहे. ले. जनरल स्तरावरच्या चर्चेनंच त्यावर उपाय सापडेल का, चीन लगेच शांत बसेल का याची साशंकता आहे. त्यामुळे राजकीय दृष्टया चीनच्या आक्रमकतेला आवर घालणं हेच मोठं आव्हान असणार आहे.

Post a Comment

0 Comments