अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानच्या कराची शहरात कोरोनाने मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख याना विचारला असता त्यानी प्रश्नाला हसत हसत उत्तर देणे टाळले
अनिल देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्तिथीचा आढावा घेण्यासाठी आज चंद्रपुरात बैठक घेतली त्यानंतर त्यानी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केले.
याचदरम्यान त्याना दाऊदच्या मृत्यूबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. "आधी चंद्रपूरचं बगु, तुम्ही थेट कराचीत पोहोचलात असं ते म्हणाले . यावेळी त्यानी अनेक विषयावर भाष्य केले .

दाऊद इब्राहिम कोण?
गुन्हेगारी विश्वाचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबई आणि परिसरात अनेक गुन्ह्यांची मालिका उघडली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.
दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरीचा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो. भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील भूमिकेबद्दल त्याच्यावर 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.
दाऊद आपल्या देशात नसल्याचं सांगत पाकिस्तानने अनेक वेळा हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल.
0 Comments