जगाला संकटात ओढू पाहणाऱ्या चीनवर येणार भीक मागण्याची वेळ.

जगाला संकटात ओढू पाहणाऱ्या चीनवर येणार भीक मागण्याची वेळ. 

  •  कोरोनाच्या संकटात चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा सुरुंग . 
  • जगाला संकट पाडणाऱ्या चीनवर येणार भीक मागण्याची वेळ. 
  • चीनसमोर आर्थिक औद्योगिक मंदीसह मोठा डोंगर. 

              जगाला संकटात टाकणाऱ्या चीनवर आता खूपच वाईट वेळ  आहे . आर्थिक , सामाजिक पातळीवर चीन फारच मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडत चाललाय . करावे तसे भरावे या म्हणीप्रमाणे चीनची अवस्था फारच बिकट होत आहे. 
जगभरात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन वाढत  आहे . त्यामुळे भारतासह  अनेक देशांची आर्थिक घडी  विस्कळीत झाली आहे. या सगळ्याला चीनच कारणीभूत आहे असं म्हंटल जात . जिथे कोरोनाचा जन्म झाला आशा चीनसमोर आर्थिक औद्योगिक मंदीसह मोठा डोंगर उभा आहे.   सामाजिक तसेच आर्थिक पातळीवर चीनची मोठी होरपळ झाली आहे .


  • चीन भिकेला लागण्याची चिन्ह 

चिनी कंपन्या बंद करण्याचा कायदा अमेरिकेतील सिनेटने मंजूर केलाय त्यामुळे आता अमेरिकेतही चीनचा टिकाव लागेल असं दिसत नाही .चीनमध्ये निर्मित होण्याऱ्या आय फोननेही भारतात कंपनी सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनमध्ये कंपन्या सुरु असल्या तरीही मागणी नसल्याने कंपन्या बंद पडण्याची चिन्हे दिसत आहेत . अनेक चिनी युवक बेरोजगारी झाले आहेत. त्याचबरोबर चीनमध्ये स्टील ची मोठ्या  प्रमाणात  आयात होते परंतु ऑस्ट्रेलियाने चीनला स्टील देण्यास नकार दिला आहे परिणामी चीनमधील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत . १९७६ सालानंतर पहिल्यांदाच चीनची अर्थव्यवस्था ६.८% घसरली आहे. इतकेच नव्हे  तर चीनमध्ये सामाजिक आंदोलनही सुरु आहे त्याचा सामना चीनला करावा लागतोय . जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाही चीनने कोणतीच मदत केली नाही हे काही आता लपून राहिले नाही त्यामुळे सगळे देश चीनकडे संशयाने बघत आहेत. त्यामुळे चीनची आर्थिक दिवाळखोरी हि करावे तसे भरावे या म्हणीचा प्रत्यय देणारी आहे. 

Post a Comment

0 Comments