शरद पवार करणार कोकण दौरा ९ जूनपासून २ दिवसांच्या कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला फटका बसल्यानंतर तेथे मोठे नुकसान झाले आहे . याच पार्श्वभूमीवर शरद पवार २ दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत .
Sharad Pawar to visit konkan tomorrow after nisarg cyclone
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत.   'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी दिनांक ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यतील नुकसानग्रस्थ भागाची पाहणी करणार आहेत .शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
         दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अलिबागचा दौरा केला होता.
रायगड जिल्ह्यसाठी तातडीने १०० कोटींची मदत : उद्धव ठाकरे 
      निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान हे रायगड जिल्ह्यचे झाले असून राज्य सरकारने तातडीने १०० कोटींची मदत जाहीर केली . उद्धव ठाकरे यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी वादळामुळे इतर जिल्ह्यमध्ये पण नुकसान झाले आहे त्यानुसार तेथे मदत जाहीर करण्यात येईल असे ते बोलले . अलिबाग येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी त्त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ,मुंबई शहराचे  पालकमंत्री अस्लम शेख ,रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे उपस्तिथ होते .

 रत्नागिरीला 75 कोटी, सिंधुदुर्गास 25 कोटींची तातडीची मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी मदत जाहीर करताना सांगितलं. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र तिथलाही आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.



Post a Comment

0 Comments