पुणे : पहिला कोरोना नंतर निसर्ग चक्री वादळ याचा फटका पुण्याला देखील बसला आहे . चक्रीवादळामुळॆ मावळ ,जुन्नर ,आंबेगाव ,खेड ,तालुकयाचे मोटे नुकसान झाले आहे . आज राज्यचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्यचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पाहणी केली .
यावेळी अजित पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ह्या नुकसानीचा आढावा घेतला.
पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाने मोठा हैदोस घातला असून अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करत आहे. मात्र, जुन्नर तालुक्यात अजित पवारांना वेगळी परिस्थिती जाणवली. तालुक्यात शेतकऱ्यांचे पंचनामे हे अतिशय कमी झाले होते. त्यावर अजित पवार यांनी जुन्नरमधील अधिकाऱ्यांचा आपल्या शैलीत पंचनामा केला. दोन दिवस झाले, आतापर्यंत पंचनामे व्हायला हवे होते, असे देखील अजित पवारांनी आपल्या अधिकाऱ्यांना खडसावले.मावळमधील फुल उत्पादकाचे नुकसान पाहण्यासाठी अजित पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि प्रशासनाला सूचना केल्या. अजित पवार उत्तर पुणे जिल्ह्यात गेले, त्याठिकाणची परिस्थिती त्यांना वेगळीच जाणवली. जुन्नर तालुक्यातील अनेक नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामेच झाले नसल्याची बाब समोर आली त्यात तेथील एक महिला समोर आली, तिने आपल्या घरावरचे पत्रे या वादळात उडून गेल्याची कैफियत अजित पवार यांच्यासमोर मांडली. सबंधित महिलेला अजित पवारांनी धीर दिला आणि आपला मोर्चा प्रशासनाकडे वळविला.
0 Comments