कोरोना लसीचे २० लाख डोस तयार डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा :कोरोना लसीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे

अमेरिकेत कोरोना लसीचे 20 लाख डोस तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन :कोरोना लसीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. 
कोरोना लसीबाबत महत्त्वाची बैठक झाली .वैज्ञनिकानी एक लस विकसित केली आहे या लसीचे २० लाख डोस  तयार केले  आहेत.या लसीवरील चाचणी यशस्वी झाली तर या लसीचे वितरण सुरु करण्यात येईल .असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले . 
“कोरोना लसीबाबत आम्ही अविश्वसनीय असं चांगलं काम करत आहोत. या कामात आम्हाला सकारात्मक यश मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. लस विकसित करण्याच्या कामात प्रगतीदेखील होत आहे. ही लस सुरक्षा तपासणीत यशस्वी ठरली तर आमच्याकडे या लसीचे 20 लाख डोस उपलब्ध आहेत. याशिवाय विविध भागात लस पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थादेखील सज्ज आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
जगभरात १८६ देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे .या देश्यामध्ये कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले कोरोनाची लस विकसित करण्याच्या दृष्टीने आमचं जगभरातील देशांसोबत काम सुरु आहे.जे झाले ते खूप वाईट झाले आम्ही चीन सोबत पण कोरोना लस विकसित करण्याच्या दृष्टीने काम करत आहोत असे देखील ट्रम्प म्हणाले . दरम्यान, कोरोना लस विकसित करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेतही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यावर सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘गिलीड सायंजेस’ या औषध कंपनीने तयार केलेलं ‘रेमेडेसिवीर’ औषध तयार केलं आहे. डॉक्टरांची एक टीम या औषधाच्या क्विनिकल ट्रायलवर नजर ठेवून आहे.

Post a Comment

0 Comments