हादरलेल्या कोल्हापूरला मोठा दिलासा!*


 
कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळपास आठवडाभरानंतर दिलासादायक बातमी आहे. काल दि.२० मे रोजी रात्री ८.३० पर्यंत १ हजार २९५ आणि आज सकाळी १० वाजेपर्यंत ३४३ असे एकूण १ हजार ६३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम, डॉ. डी. वाय. पाटील, आयसोलेशन हॉस्पीटल या प्रमुख हॉस्पिटलसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, अतिग्रे येथील संजय घोडावत हॉस्टेल, अॅपल हॉस्पिटल आणि आधार हॉस्पिटल या एकूण १८ ठिकाणी स्वॅब कलेक्शन करण्यात येते. 

Post a Comment

0 Comments