महाविकासआघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण . मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर मुंडे हे कोरोनाची लागण झालेले तिसरे मंत्री आहेत.
मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना काही सचिवांसह देखील कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले.राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड 19 निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 6,09317 नमुन्यांपैकी 97,648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत.
0 Comments